Maharashtra Government Jobs: राज्यात 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती; आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार- Devendra Fadnavis

सरकारी नोकऱ्यांमध्ये एक विक्रम निर्माण झाला आहे. सरकारने 1 लाख पेक्षा जात नोकऱ्या दिल्या आहेत. 75,000 नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आधीच 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती केली आहे.

Maharashtra Government Jobs: राज्यात 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती; आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis | Twitter/ANI

Maharashtra Government Jobs: विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणतात, ‘आम्ही 70 लाख इच्छुकांच्या परीक्षा घेतल्या आहेत आणि पेपर फुटल्याचे एकही प्रकरण आढळले नाही. प्रवेश परीक्षेदरम्यान झालेल्या काही चुकीच्या बाबींच्या 47 एफआयआर आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये एक विक्रम निर्माण झाला आहे. आमच्या सरकारने 1 लाख पेक्षा जात नोकऱ्या दिल्या आहेत. आम्ही 75,000 नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आम्ही आधीच 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती केली आहे आणि आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार आहेत.’ (हेही वाचा: Maharashtra Challan Update: चलान थेट बँक खात्यातून वसूल होणार? थकीत असलेले 2,429 कोटी वसूल करण्यासाठी राज्य सरकाची बँक खाते ई-चालानशी जोडण्याची केंद्राकडे मागणी)

पहा पोस्ट- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2024 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).