महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यामध्ये झालं आहे. सुमारे 28 हजार हेक्टर मध्ये शेतीचं नुकसान झालं आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये काही गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आहे. नक्की वाचा: Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)