घाटकोपर येथील पंतनगर भागात आज संध्याकाळच्या वेळेस झालेल्या जोरदार वादळी पावसात एक होर्डिंग पेट्रोल पंप वर पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जखमींना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे मात्र त्यात चौघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्याचं सांगितलं आहे. या दुर्घटनेतील दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

घाटकोपर च्या होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत चौघे मृत्यूमुखी

बचावकार्य अजूनही सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)