रतन टाटा यांचं 86 व्या वर्षी निधन झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दरम्यान रतन टाटांच्या सन्मानार्थ आज आदरांजली अर्पण करत महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा दुखवटा पाळला आहे पण त्यासोबतच आता रतन टाटांना 'भारतरत्न' देण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मांडला आहे. या पुरस्काराचा प्रस्ताव आता केंद्र सरकार कडे विनंती केली जाणार आहे. आज मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शोक प्रस्ताव मांडला होता. Condolence Messages for Ratan Tata Go Viral: रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघा भारत हळहळला; सामान्य नेटकर्यांकडून प्रेरणादायी Quotes शेअर करत श्रद्धांजली अर्पण.
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार?
Maharashtra cabinet passes resolution to urge Centre to confer 'Bharat Ratna', the country's highest civilian award, on late Ratan Tata
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2024
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना #भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)