Mahaparinirvan Diwas 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 6 डिसेंबर, शुक्रवार रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत शासनाने एक परिपत्रकही जारी केले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत चतुर्दशी’ आणि ‘गोपाळकाला’ (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता 2024 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातिवाद निर्मूलनासाठी आणि गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठा जनसमुदाय येतो. त्यांचे अनुयायी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहतात. या बाबी ध्यानात घेऊन आता राज्य सरकारने 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. (हेही वाचा: Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांसाठी खास भाषणांचे नमुने)

Mahaparinirvan Diwas 2024 Local Holiday-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)