लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.सध्या या ठिकाणी पियूष गोयल यांनी आपल्या प्रचाराचा जोर वाढवला असून सोबतच ते राज्यात इतर ठिकाणीही सभा घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)