पुण्यामध्ये मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्याच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरल्याचं पाहण्यात आलं आहे. यासाठी जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. आबालवृद्धांनी यामध्ये 'चिपको आंदोलन' केलं. अनेकांनी झाडांना मिठी मारत वृक्षतोडीला प्रखर विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी झाडं तोडून ती पुन्हा लावली जातील पण ती टिकण्याची शक्यता कमी आहे. तसेच प्रकल्पामुळे अन्य समस्या निर्माण होणार आहेत त्याकडेही लोकांनी लक्ष वेधलं आहे.
Pune, Maharashtra | Locals & environmental activists holds protest in Pune against the Pune riverfront development (RFD) project. pic.twitter.com/UlfOs2dcDe
— ANI (@ANI) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)