सप्टेंबर 2024 मध्ये घोषणा झाल्यापासून चार महिन्यांची अपेक्षा आणि उत्साहानंतर, ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्ले (Coldplay) अखेर या शनिवार व रविवारी मुंबईत (Mumbai) आपली कला सादर करणार आहे. या शोसाठी देशभरातील चाहते मुंबईमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. आता बुकमेशो लाईव्हने (BookMyShow Live) कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टसाठी समर्पित लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी, भारतीय रेल्वेसोबत भागीदारी केली आहे. ही विशेष सेवा 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरला उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांसाठी प्रवास सुनिश्चित करेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव आणि नेरुळ दरम्यान धावणारी विशेष ट्रेन पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनला जोडेल आणि अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि जुई नगर सारख्या महत्त्वाच्या भागात थांबेल. चाहते त्यांचे तिकीट केवळ BookMyShow वर बुक करू शकतात, ज्याचे शुल्क दुतर्फा तिकिटासाठी फक्त रु. 500/- आहे. मोठ्या गटांसाठी, बुकमायशोने Cityflo सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे चाहत्यांना सिटीफ्लो ॲप वापरून गोरेगाव, दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथून खाजगी बसेस बुक करता येतात.
कार्यक्रमाची वेळ-
ग्रॅमी पुरस्कार विजेता बँड कोल्डप्ले त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'चा एक भाग म्हणून भारतात येत आहे. ते 18 जानेवारी (शनिवार), 19 (रविवार) आणि 21 (मंगळवार) मुंबईत कार्यक्रम सादर करणार आहेत. हे तीनही शो नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. माहितीनुसार, गेट्स दुपारी 3:00 वाजता उघडतील आणि 7:45 वाजता बंद होतील. कोल्डप्ले संध्याकाळी 7:45 नंतर स्टेजवर येणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: Navi Mumbai Traffic Restrictions For Coldplay Concert: नेरूळ च्या डॉ. वाय पाटील स्टेटियम वरील 'कोल्डप्ले कॉन्सर्ट' च्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाची नियमावली जारी)
जाणून घ्या कार्यक्रमस्थळी कसे पोहोचायचे-
कार्यक्रमस्थळासाठी सर्वात जवळची लोकल ट्रेन स्टेशन्स हार्बर लाईनवरील नेरुळ आणि सीबीडी बेलापूर आहेत, दोन्ही अंदाजे 3 किमी अंतरावर आहेत. याव्यतिरिक्त, बस किंवा ऑटो/कॅबने कार्यक्रमस्थळी जाता येऊ शकते. पार्किंग उपलब्ध नाही, म्हणून सार्वजनिक वाहतुकीची शिफारस केली जात आहे. नोव्हेंबरमध्ये या शो ची तिकीट विक्री सुरु झाली व त्याच वेळी शोची सर्व तिकिटे विकली गेली. त्यानंतर BookMyShow ने गेल्या आठवड्यात शोसाठी अतिरिक्त मर्यादित तिकिटे जारी केली होती, परंतु ती देखील लवकर विकली गेली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)