Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने आज (22 जून) मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल. शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी रिमझित तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवसाचे नियोजन करण्यासाठी हवामान अपडेट पाहत राहा. (हेही वाचा- पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या अंदाज)
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश असून हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २७°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)