दरवर्षी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाही लाखोंच्या संख्येने भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती असल्याची ख्याती आहे, त्यामुळे इथे भाविक मोठ्या प्रमाणात दान-धर्म करतात. आता लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे. रविवारी दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर हा लिलाव आयोजित करण्यात आलेला आहे. (हेही वाचा: Woloo Women’s Powder Rooms: मध्य रेल्वे मुंबईमधील सात स्थानकांवर सुरु करणार 'वुलू महिला पावडर रूम'; जाणून घ्या शुल्क व काय असेल खास)
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव रवि. दि 1 ऑक्टो2023 रोजी संध्याकाळी ठीक 5 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आलेला आहे.तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.#lalbaugcharaja pic.twitter.com/Fo4Jgwlv8q
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)