Women’s Powder Rooms (प्रातिनिधिक | संग्रहित | संपादित प्रतिमा)

राज्यात दोन वर्षांपूर्वी महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ‘वुलू’ (WOLOO) ॲपचे लोकार्पण झाले होते. याद्वारे महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास महिलांचे स्वतंत्र प्रसाधनगृह वुलू, म्हणजेच 'वुमन्स पावडर रूम' (Woloo Women’s Powder Rooms) सुरु करण्याचे उद्दिष्ट होते. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सात प्रमुख स्थानकांवर ‘वुलू महिला पावडर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभिनव उपक्रम, येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, कांजूरमार्ग, मुलुंड, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर 'वुलू वुमेन्स पावडर रूम' संकल्पना साकारण्यात येणार आहे. स्थानकांवर 200 स्क्वेअर मीटरमध्ये या रूम्स असतील. या पावडर रूम केवळ महिलांसाठी डिझाइन केल्या आहेत. शौचालय, वॉशबेसिन आणि आरशांनी सुसज्ज अशा या जागेद्वारे महिलांना आरामदायक आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. या उपक्रमामुळे रेल्वेला 5 वर्षांसाठी वार्षिक 39.48 लाख महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रत्येक खोलीत 4 शौचालये असतील जे 50% क्षेत्र व्यापतील. उर्वरित 50% क्षेत्रामध्ये परवानाधारकांना महिलांची स्वच्छता उत्पादने, सौंदर्य उत्पादने, पर्सानक केअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, भेटवस्तू इ. नॉन-फूड आयटम विकण्याची परवानगी असेल. ही स्वच्छतागृहे फक्त महिलांसाठी असली तरी, पुरुषांना किरकोळ क्षेत्रात प्रवेश दिला जाईल. महिला सोबत असल्यास त्यांना टेरेसवर बसण्याची परवानगी असेल. (हेही वाचा: Maharashtra Onion Crisis: महाराष्ट्र सरकार खरेदी करणार 400 कोटी किमतीचा कांदा; गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे मंत्री Abdul Sattar यांचे आश्वासन)

या ठिकाणी खाद्यपदार्थांची विक्री किंवा वितरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, केबलिंग, फॅब्रिकेशन, वीज, मनुष्यबळ आणि इतर खर्चाच्या देखभालीसह इन्स्टॉलेशन, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा खर्च परवानाधारकाकडून केला जाईल. या ठिकाणी टॉयलेटचे शुल्क प्रति व्यक्ती 10 असेल. प्रवासी महिला 365 ची वार्षिक सदस्यता देखील घेऊ शकतात. पावडर रुम्समध्ये कॅशलेस पेमेंटची तरतूद देखील प्रदान केली जाईल.