उन्हाळ्यामध्ये कोकणात, गोव्याला जाणार्यांची मोठी संख्या पाहता आता खास एप्रिल- मे महिन्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी ते मडगाव विशेष गाडी सोडण्यात आली आहे. आज 2 एप्रिल पासून या विशेष गाडीचं बुकिंग सुरू झालं आहे. 6 एप्रिल ते 4 मे दरम्यान ही ट्रेन मडगाव- एलटीटी धावणार आहे तर एलटीटी ते मडगाव ही ट्रेन 7 एप्रिल ते 5 मे धावणार आहे. रविवारी संध्याकाळी 4.30 ला मडगावातून सुटणारी ट्रेन सकाळी 6.30 च्या सुमारास एलटीटीला येणार आहे. तर दर सोमवारी सकाळी 8.20 च्या सुमारास एलटीटी मधून सुटणारी ट्रेन रात्री 9.40 ला मडगावला पोहचणार आहे.
Running of Special Trains during Summer Season - 2025. pic.twitter.com/QhKxhfV9PV
— Konkan Railway (@KonkanRailway) March 29, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)