Kalyan: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ आज 'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आला. या ठिकाणी आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र आश्चर्यकारकरित्या त्याचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार या व्यक्तीने कल्याण स्थानकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण रुळाखाली झोपला, त्याच्यावरून लोकल गेली. मात्र तो सुखरूप बचावला. (हेही वाचा: Man Bath In JCB: इंजिनीअरनं थेट जेसीबीत बसून केली नदीत आंघोळ, व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)