मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका व्यक्तीची जन्मठेपेची शिक्षा 10 वर्षांच्या तुरुंगवासात बदलली आहे. 2015 मध्ये या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती. बायकोचा गुन्हा एवढाच होता की तिच्याकडून चिकन करी जळाली होती. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने मंगळवारी 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा निकाल दिला.

न्यायालयाने म्हटले की, ‘आरोपीने हल्ला करण्याची तयारी केली नव्हती. पत्नीने जेवण बनवले नसल्याचे पाहून त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणात वापरलेले हत्यार हे लाकडी हत्यारासारखे घातक आहे. यामुळे पत्नीला इजा होईल, याची जाणीव पतीला होती परंतु पत्नीला दुखावण्याचाही आरोपीचा हेतू होता. आरोपीने परिस्थितीचा अवाजवी फायदा घेतला नाही आणि क्रूर किंवा असामान्य वर्तन केले नाही.’ पत्नीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्याचे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 10 वर्षांच्या कारावासात रूपांतर केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)