रविवार, 16 एप्रिल दिवशी नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळच्या रणरणत्या उन्हात खुल्या मैदानावर हा कार्यक्रम झाल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी श्री सेवकांची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. पण त्यानंतर मीडीयात बोलताना अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक परिपत्रक जारी करत यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यादरम्यान उष्मघातामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया.
माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती, आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम असून त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. pic.twitter.com/Q04EocGmtO
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)