सध्या मुंबईमध्ये हॅटमॅन किलरच्या व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. एक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये  काळ्या टोपीतील एक व्यक्ती एका महिलेला पकडून चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत आहे. ही घटना मुंबई शहरात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी ही क्लिप पूर्णपणे बनावट असल्याचे सांगून डिबंक केले. शहर पोलिसांनी मुंबईकरांना ही क्लिप पुढे शेअर न करण्याची विनंती केली आहे, कारण यामुळे शहरातील लोकांमध्ये अराजकता आणि दहशत निर्माण होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)