प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांचे आज मुंबई मध्ये हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळी 6-10 दरम्यान पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यदर्शनाला ठेवलं जाणार आहे त्यानंतर रात्रीच त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्र शासनासोबत त्यांनी अनेक कामं केली होती. आज त्यांच्या अकस्मात निधनावर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे.
महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा.हरी नरके यांनी आपली अशी ओळख…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2023
शरद पवार
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय… pic.twitter.com/hlyv43Gw64
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2023
देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे.
प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 9, 2023
छगन भुजबळ
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू… pic.twitter.com/JhYVny9Dia
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) August 9, 2023
आदित्य ठाकरे
ज्येष्ठ विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या जीवनाचे गाढे अभ्यासक, लेखक प्रा. हरी नरके जी ह्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)