Mumbai Local Train Freak Accident: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसात मुंबई ट्रेनमधून प्रवास करणे हे फारच धोकादायक ठरू शकते. शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणे हे एका तरुणाला चांगलेच महागत पडले आहे. ट्रेन भरगच्च भरली असल्याने हा तरुण बाहेर लटकलेला. त्यानंतर तरुण खांब्याला धडकून चालत्या ट्रेनमधून खाली पडला. ट्रेनमधून खाली पडल्यानंतर तो जखमी झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर RPF ने प्रतिक्रिया दिली आहे. सदर व्हिडिओ हा जुना असून या घटनेत तरुण जखमी झाल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. (हेही वाचा- रुळ क्रॉस करताना बस अडकली, मोटारमॅनच्या मदतीने 40 विद्यार्थ्यांची सुटका)
पाहा पोस्ट -
Sir/ Madam,
The person who had fallen down sustained injuries but survived. This is an old video of June 2022. We request you to please don't create panic by spreading old videos.
We are continuously adding new lines and suburban services to the system. https://t.co/8vo0GsxBZu
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 26, 2024
To run family we need Job, To save Job , have to attend office in time, To attend office we have to catch Train, To catch daily late , Overcrowded trains we have to risk our life . Family is more important than LIFE and for @RailMinIndia Mails and Express are important Than Lives pic.twitter.com/tvlloMwoI9
— मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha (@MumRail) July 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)