मालगाडीचे डबे घसरुन विस्कळीत झालेली वाहतूक लवकरच पूर्वपदावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. कसारा जवळ मालगाडीचे सात डबे काल (रविवार, 10 डिसेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घसरले होते. त्यामुळे रेल्वे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. दरम्यान, मालगाडीचे डबे रुळावर घेऊन ते यार्डात पाठवले आहेत. तसेच, पठरी साफ करण्याचे काम गतीने सुरु आहे. परिणामी कसारा ते इगतपुरी बाजूला डाउन मेनलाइनवर मेल एक्सप्रेसची वाहतूक लवकरच सुरू होईल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)