Mumbai Water Tanker Strike Called Off: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासासादायक बातमी आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशन (Mumbai Water Tanker Association) ने आपला संप मागे (Strike Called Off) घेतला आहे. आता टँकर असोसिएशन तात्काळ काम सुरू करणार आहे. मुंबई मनपा आयुक्तांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यानंतर मुंबईतील टँकर चालकांनी (Water Tanker Operators in Mumbai) संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. टँकर असोसिएशनने संप मागे घेण्यास नकार नकार दिल्याने, मुंबई महानगरपालिकेने रविवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करून पोलिस आणि वाहतूक आयुक्तालयाच्या मदतीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर, विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेतले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)