31 ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या गणपती उत्सवापूर्वी, बीएमसीने गेल्या एका महिन्यात विविध गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेल्या 1,249 अर्जांपैकी 503 अर्जांना परवानगी दिली आहे. 102 मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्या असून उर्वरित 506 अर्ज अद्याप प्रक्रियेत आहेत. साथीच्या आजारापूर्वी, सुमारे 3,000 मंडळे परवानगीसाठी अर्ज करत असत. सरकारने धार्मिक महत्त्व असलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोविड निर्बंध उठवले असल्याने मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये सुमारे 2,520 मंडळांनी परवानग्या मागितल्या होत्या; त्यापैकी 1,996 मंजूर करण्यात आले. 2020 मध्ये, केवळ 1,700 मंडळांना नागरी संस्थेची मंजुरी मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)