Educational Scholarship For Hindu Students: मुंबईमधील महालक्ष्मी मंदिराने गरजू हिंदू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आपली शैक्षणिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मंदिर ट्रस्टची ही शिष्यवृत्ती कोविड-19 महामारीच्या काळात थांबवण्यात आली होती. आता ही पुन्हा सुरु करण्यात येत आहे. इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंतच्या होतकरू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृती दिली जाईल. शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिर, कोविड-19 साथीच्या काळापर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देत होते. वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उदात्त हेतूने, मंदिर ट्रस्टने या वर्षासाठी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
शुक्रवारी, मंदिर ट्रस्टने जाहीर केले की, ते गरीब आणि होतकरू हिंदू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल. शिष्यवृत्ती प्राप्त करू इच्छिणारे विद्यार्थी मंदिराच्या प्रशासन कार्यालयात विनामूल्य अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या छायाप्रती, हिंदू असल्याचा पुरावा, शिधापत्रिकेवरील समान पत्त्यासह शिधापत्रिकेची छायाप्रत आणि सध्याच्या निवासस्थानाचा पत्ता सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये काही बदल झाल्यास योग्य स्पष्टीकरण संलग्न करणे आवश्यक आहे. अर्जासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचे मासिक उत्पन्न प्रमाणपत्र, रद्द केलेला धनादेश आणि स्वत:च्या पत्त्यासह शिक्का मारलेला पोस्टल लिफाफा देखील आवश्यक आहे. शिष्यवृत्ती फक्त मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. (हेही वाचा: Educational and Examination Fees: राज्यात 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ; फी आकारल्यास होणार कारवाई)
पहा पोस्ट-
Mumbai: Mahalaxmi Temple Restarts Educational Scholarship For Hindu Students After Pause In Covid-19https://t.co/2uQnXhiEcM#Hindustudents #Mahalaxmitemple #Education #Scholarship #Covid
— Free Press Journal (@fpjindia) July 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)