EC Officials Check Eknath Shinde's Bag: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा आपले हेलिकॉप्टर आणि बॅग तपासल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितले की, इतर नेत्यांच्या बॅगाही तपासल्या गेल्या आहेत. बुधवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांची 'बॅग' तपासली. त्यानंतर दुपारी सीएम एकनाथ शिंदे यांच्या बॅगचीही झडती घेण्यात आली. त्यावेळी शिंदे हे निवडणूक प्रचारासाठी पालघरला जात होते.
शिंदे यांची बॅग तपासतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये फक्त 3 जोडी कपडे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बॅगही तपासण्यात आली होती. तपासादरम्यान अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या बॅगेतून चकली आणि लाडूंचा एक बॉक्स सापडला.
निवडणूक आयोगाने तपासली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग -
पालघर में शिवसेना उम्मीदवार से मिलने पहुंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बैग की चुनाव आयोग के अधिकारियों ने जांच की. #Palghar #MaharashtraElection2024 pic.twitter.com/Qvh6Gco8Wd
— NDTV India (@ndtvindia) November 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)