मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी  वेळ लागत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  मॉन्सून अपडेट्समध्ये पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांचा हवाला देत सकाळी 9:30 वाजता ट्विट केले की, चर्चगेट ते डहाणू रोड आणि माहीम ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर ट्रेन्स सामान्यपणे धावत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. ज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी यासह काही भागांचा समावेश आहे.

पहा ट्विट

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)