Dr. Snehalata Deshmukh Passed Away: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगूरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वयाच्या 85 वर्षाच्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. स्नेहलता यांनी मुंबईत विद्यापीठात कुलगुरु असताना महत्त्वाची कामगिरी केली. गर्भ संस्कार, नवजात शिशू आणि माता आहार या विषयांवर त्यांनी काम केले. त्या मुंबईतील प्रसिध्द सायन रुग्णालयाच्या डीन होत्या. सध्या त्या मुंबईतील पार्ले टिळख विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. (हेही वाचा- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन)
ख्यातनाम शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन. pic.twitter.com/C3sszdw4M4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)