Domestic Violence Towards Wife: मुंबईतील एका स्थानिक न्यायालयाने 43 वर्षीय महिलेची तिचा पती आणि त्याच्या नातेवाईकांवर घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. या प्रकरणात डीव्ही ॲक्ट गुन्ह्यांचा आरोप असलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता करताना मुंबई न्यायालयाने सांगितले की, एखादा पुरुष आपल्या आईसोबत वेळ घालवत असेल किंवा तिला पैसे देत असेल हे त्याच्या पत्नीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचे प्रमाण ठरणार नाही. सुरुवातीला 2015 मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने या महिलेची याचिका फेटाळून लावली होती. महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला की, तिच्या पतीने त्याच्या आईला सतत आर्थिक मदत करणे आणि आईसोबत वेळ घालवणे यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद झाले. आता मुंबईतील दिंडोशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आशिष अयाचित यांनीही महिलेची याचिका फेटाळून लावली.
दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा हे जोडपे पतीच्या आईपासून दूर राहू लागले, तेव्हा पती अनेकदा त्याच्या आईला भेटायचा आणि ती त्याच्याकडे पैशांची मागणी करायची. आता संपूर्ण पुराव्यावरून सत्र न्यायालयाने सांगितले की, पती आपल्या आईला वेळ आणि पैसा देत असल्याची महिलेची तक्रार घरगुती हिंसाचार मानता येणार नाही. (हेही वाचा: Brutal Murder of Wife: पत्नीचे कापलेले डोके हातात घेऊन परिसरात फिरत राहिला पती; Valentine's Day दिवशी समोर आली हत्येची धक्कादायक घटना)
Husband spending time with mother, giving her money is not domestic violence towards wife: Mumbai Court
report by @Neha_Jozie https://t.co/DNY8fgALix
— Bar & Bench (@barandbench) February 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)