पुण्याच्या वाकड मध्ये एक निर्माणाधीन इमारत क्रॅक्स पडल्याने PCMC कडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग कडून ही तातडीची पावलं उचलण्यात आली. सध्या इमारतीच्या पाडकामाचा व्हिडिओ वायरल होत आहे. सुनील दोलवानी यांच्या तीन मजली (G+3) इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले होते मात्र ती झुकल्याचं लक्षात आल्यानंतर तिला पाडण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)