आज मुंबई पोलिस कमिशनर विवेक फणसळकर हे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे Mumbai Police Commissioner पदाची सूत्रं आली आहेत. त्यांनी आज नव्या जबाबदारीचा पदभार सांभाळला आहे. ते 1994 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. 56 वर्षीय देवेन भारती यांनी मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2023 मध्ये राज्य सरकारने त्यांची मुंबईतील विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे पद निर्माण करण्यात आले आहे. नक्की वाचा: Deven Bharti Appointed New Mumbai Police Commissioner: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या कारकीर्द.
देवेन भारती नवे मुंबई पोलिस कमिशनर
Deven Bharti takes charge as Mumbai Police Commissioner pic.twitter.com/qoMldslMsW
— ANI (@ANI) April 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)