महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या मेलमध्ये त्यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याबद्दल भाष्य केले आहे. हे धमकीचे ईमेल गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलीस स्टेशन तसेच मंत्रालय (राज्य सचिवालय) यांना पाठवण्यात आले आहेत. या धमकीनंतर, मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.धमकी पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ईमेल आयडीचा आयपी अॅड्रेस अधिकारी शोधत आहेत. या धमकीनंतर शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. महायुतीचे अनेक नेते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी दिलीला गेले आहेत. (हेही वाचा: Law Against 'Love Jihad': 'आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही चूक नाही, परंतु फसवणुकीद्वारे होणारे संबंध थांबवले पाहिजेत'- CM Devendra Fadnavis)
Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat:
#BreakingNews: Maharashtra Deputy CM Eknath Shinde receives death threat via an email
Sender threatens to blow up his car
Mumbai Police & Crime Branch launch a probe @RuchaKanolkar15 brings in more info | @RitangshuB pic.twitter.com/pkFrkRLBL3
— Mirror Now (@MirrorNow) February 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)