राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, साने गुरुजी स्मारक समितीत काम केलेले, कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. ते 72 वर्षांचे होते. दत्ता इस्वलकर हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते.
गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा एक बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/il62lz7R03
— Supriya Sule (@supriya_sule) April 7, 2021
गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे गिरणी कामगारांचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
आम्ही सर्व इस्वलकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. pic.twitter.com/pQmB6xjECC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)