मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सोमवारपर्यंत दिलासा दिला आहे. अनिल परब यांच्यावर दापोली रिसॉर्ट मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सोमवार (20 मार्च) पर्यंत कोणतीही कठोर पावले उचलून नयेत असे निर्देश मुंबई हायकोर्टाने ईडीला दिले आहेत.
दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीने या आधीच अटक केलीआहे. त्यांना 14 दिवसांची ईडी कोठडी न्यायालयाकडून मिळाली आहे. तसेच, या प्रकरणात आजही एक जणास अटक झाल्याचे समजते. मात्र, अटक झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.
ट्विट
Desai - I've just been informed that the revision has been allowed in the sessions court.
J Dere - We will grant no coercive action. #BombayHighCourt #ED #AnilParab
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)