Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या तब्बल 6,347 रुग्णांची नोंद; सध्या 22,334 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
आज शहरात 451 रुग्ण बरे झाले आहेत आणि एक मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णसंख्या दिवसाला अवघे 300-400 पर्यंत खाली आली होती. यामध्ये आता हजारांनी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 6,347 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 5,712 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. आज शहरात 451 रुग्ण बरे झाले आहेत आणि एक मृत्यू झाला. सध्या शहरात 22,334 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत मुंबईमध्ये एकूण 750158 रुग्ण बरे झाले आहेत. काल, 31 डिसेंबर रोजी शहरात 5,631 संसर्गाची नोंद झाली होती.
Mumbai reports 6,347 fresh COVID cases (5,712 asymptomatic), 451 recoveries, and one death today
Active cases: 22,334
Total recoveries: 750158
On Dec 31, the city recorded 5,631 infections pic.twitter.com/QGk9BeR977
— ANI (@ANI) January 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2022 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

