काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची एक बैठक राजधानी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी महाविकासआघाडीतील जागावाटपांवर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील किमान 18-19 जागांवर चर्चा केली. आम्ही किमान 12 जागा निश्चित केल्या आहेत आणि उद्या सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीत अंतिम चर्चा होईल. त्यानंतर उद्या किंवा परवा सर्व जागा जाहीर केल्या जातील. (हेही वाचा, Sanjay Raut On BJP: काँग्रेस नसती तर भाजपवाले ब्रिटीशांची गुलामी करत असते- संजय राऊत )
एक्स पोस्ट
#WATCH | After CEC meeting, Maharashtra Congress President Nana Patole says, "We have discussed at least 18-19 seats of Maharashtra, we have finalized at least 12 seats and tomorrow morning we have a meeting with Sharad Pawar and Uddhav Thackeray. Final discussions will be held… pic.twitter.com/WOPL53IZlc
— ANI (@ANI) March 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)