Narayan Rane On Recession India: जून महिन्यात देशात मंदी येण्याची भीती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सोमवारी म्हटले आहे की, जागतिक आर्थिक मंदीचा नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. नारायण राणे पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यात पहिल्या G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या (IWG) बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, यावेळी त्यांनी सांगितले की, हे खरे आहे की सध्या विविध विकसित देश मंदीचा सामना करत आहेत. जूननंतर मंदी येण्याची शक्यता आहे. देशातील नागरिकांना मंदीचा फटका बसू नये यासाठी केंद्र आणि पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)