राम जन्मभूमी सोहळ्याचा उत्साह असताना मीरा रोड मध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 21 जानेवारीची आहे. काहींनी रामाचे झेंडे फडकत असलेल्या गाड्यांवर काठी आणि दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतच त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून घटनेचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे. Amazon Receives Notice: 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद'च्या नावाखाली मिठाईची विक्री; अॅमेझॉनला नोटीस, 7 दिवसांत मागितले उत्तर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)