मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी बीएमसी निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीमध्ये ते कोणाशीही युती करणार नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवणार आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही घोषणा केली आहे.@RajThackeray #RajThackeray #MNS #BMC #MTCard pic.twitter.com/oifc4GrBRy
— Mumbai Tak (@mumbaitak) November 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)