अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By election) आता पुन्हा एकदा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे गट (BJP VS Uddhav) असा सामना रंगणार आहे. म्हणजे मशाल विरुध्द कमळ ही लढत राज्याच्या राजकारणात चांगली गाजणार असणार आहे. कारण अंधेरीत शिंदे गटाकडून (Shinde Group) नाही तर मित्रपक्ष भाजपकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणुसाठी भाजपने मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर मुरजी पटेल यांनी भाजप पक्षश्रेष्ठीसह शिंदे गट म्हणजेचं बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आभार मानले आहे.
लढू... जिंकू... इतिहास घडवू...
अंधेरी पूर्वेतील तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणुन मला उमेदवारी दिल्याबद्दल भाजपा व बाळासाहेबांची शिवसेनेच्या वरिष्ठांचे मनापासुन आभार.
(1/3)
— Murji Patel (@Murji_PatelBJP) October 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)