आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर आरोग्य क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील आपल्या दु:खद प्रतिक्रिया देत सोशल मीडीया द्वारा श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्या आहेत.
CMO Maharashtra
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 10, 2021
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य श्री बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. श्री. तांबे यांनी लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. pic.twitter.com/zJe51ZJAuX
— Governor of Maharashtra (@maha_governor) August 10, 2021
आमदार रोहित पवार
जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन मनाला अत्यंत वेदना देणारं आहे. आयुर्वेद आणि योगाच्या दांडग्या अभ्यासकाला आपण मुकलो आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली💐 pic.twitter.com/MW2bl0Fm90
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2021
अरूण लाड
आयुर्वेद, योग, संगीतोपचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद जगताची अपरिमीत हानी झाली आहे. परमेश्वर त्यांना सद्गती देवो.#BalajiTambe @deeyot pic.twitter.com/5S8Jn3YYkN
— Arun Lad (@NCPArunLad) August 10, 2021
डॉ. मनिषा कायंदे
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन!!
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते !!
भावपूर्ण श्रद्धांजली!!#balajitambe pic.twitter.com/mot3xOBLaR
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)