आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या रिवाजानुसार मुख्यमंत्री पंढरपूरामध्ये विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा करतात. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळू शंकर अहिरे-आशाबाई बाळू अहिरे या मानाच्या वारकरींसोबत शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. पंढरपूरामध्ये आज भक्तिमय वातावरणामध्ये लाखो वारकरी विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. अहिरे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील असून मागील 15 वर्षांपासून वारी करत आहेत. Ashadhi Ekadashi 2024 HD Images In Marathi: आषाढी एकादशी निमित्त खास Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.
शासकीय महापूजा संपन्न
#आषाढीएकादशी निमित्त मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सपत्नीक श्री. विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. नाशिक जिल्ह्यातील श्री. बाळू शंकर अहिरे व सौ. आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेचा मान.@MahaDGIPR pic.twitter.com/diPmeYaZwN
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) July 17, 2024
Maharashtra CM Eknath Shinde offers prayers at Maha Puja of Sri Vitthal Rukmini Mata on the occasion of Ashadhi Ekadashi
(Source - Eknath Shinde/X) pic.twitter.com/9k9qg2zWwp
— ANI (@ANI) July 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)