Ajit Pawar Meet To Sharad Pawar: राजकीय वर्तुळातून सध्या अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या बंडानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांची गुप्त भेट घेतली आहे. पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. यासंदर्भात एबीपी माझा या मराठी वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केलं आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार स्वत:च्या गाडीने न जाता दुसऱ्या गाडीने गेले. तसेच चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार माध्यमांना चुकवताना दिसून आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवारांची गुप्त भेट झाल्याचं समोर #AjitPawar #SharadPawar #Pune #NCPhttps://t.co/lhlZyf312U
— ABP माझा (@abpmajhatv) August 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)