Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: आदर्श विद्यामंदिर बदलापूर च्या पीडीता आणि कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई होणार; ACP Suresh Varade यांची माहिती

ज्यांना संबंधित घटनेबद्दल माहिती हवी आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याच्या सूचना एसीपी Suresh Varade यांनी दिल्या आहेत.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: आदर्श विद्यामंदिर बदलापूर च्या पीडीता आणि कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई होणार; ACP Suresh Varade यांची माहिती
ACP Suresh Varade । X

आदर्श विद्यामंदिर बदलापूर मध्ये दोन शिशू वर्गातील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर सार्‍यांनीच यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेनंतर बदलापूरकरांनी आंदोलन देखील केले. मात्र यामध्येच पीडीता आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही अफवा पसरवल्या जात आहेत. ACP Suresh Varade यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान अफवा न पसवण्याचं आवाहन करत त्यांनी अशाप्रकारे अफवा पसरवण्यांवर सायबर सेल कडून कडक कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. ज्यांना संबंधित घटनेबद्दल माहिती हवी आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्यास एसीपींनी सुचवले आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2024 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).