Mumbai: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात वांद्रेतल्या निर्मल नगर पोलीस स्थानकात (Nirmal Nagar Police Station) फसणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील लोअर परेल भागातील गोमाता जनता एसआरए को ऑप हौसिंग सोसायटीमधील सदनिकांचा गैरफायदा (SRA Scam) घेतल्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, भाजपन नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहे, मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याकडून अद्याप कोणतीह प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)