Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहजादे शेख नावाच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. ही घटना सबिना नावाच्या महिलेने सोशल मीडियावर शेअर केली आहे. वृत्तानुसार, ही घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली जेव्हा आरोपी पार्सल देण्यासाठी आला. पार्सल देताना आरोपी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. महिलेने विरोध केला असता आरोपीने पीडितेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि बेदम मारहाणदेखील केली. (हेही वाचा -Molesting A Korean YouTuber: मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन युट्युबरच्या मदतीला धावला तरुण, पहा व्हिडिओ)
A delivery boy named Shahzade Sheikh arrested for molesting a woman in Mumbai's Khar area on Nov 30. Accused was recording her video while handing over the parcel. When the woman protested, accused tried to enter the house of the victim by pushing her&started abusing her: Police
— ANI (@ANI) December 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)