Mumbai Shocker: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एका 29 वर्षीय महिलेवर आकाश विठ्ठल संकपाळ या नराधमाने अनेकदा बलात्कार केला. आरोपी पीडितेच्या शेजारी राहतो. घर दाखवण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले. त्या फोटोंची धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.(हेही वाचा - Akola Crime News: दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाकडून आईची हत्या, कारण ऐकुन व्हाल अवाक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)