Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अकोला (Akola) जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका 40 वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर आणि अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केला आणि सर्वांनाच एक धक्का बसला आहे. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्या प्रकरणात हत्येचं मूळ कारण म्हणजेच खळबळजनक माहिती देखील समोर आली. (हेही वाचा -Solapur Crime: आईच्या प्रियकराची हत्या, स्विफ्ट कारमध्ये मृतदेह पेटलवा, सोलापूर येथे सख्या भावांचे कृत्य)

आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. 4 जूनला दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईचा कट रचला अन् तिचा दगडानं ठेचून खून केला. संगीता राजू रवाळे असं या मृत महिलेचं नाव आहे.  गेल्या आठवड्यात मंगळवारी सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याच समोर आलं होतंय. त्यानंतर या प्रकरणात बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हत्याचा तपास अकोला पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झाला. संगीता हिच्याच पंधरा वर्षे वयाच्या मुलानं तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव यांनी केला आहे.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. रागवायचं कारण म्हटल्या गेलं तर मारेकरी मुलांना शिक्षण सोडून दिलं, म्हणजेच शाळेत जाणे बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं.