शारीरिक संबंधादरम्यान संभोग ठेवताना नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वसाधारणपणे कंडोमचा उपयोग केला जातो. यासोबतच लैंगिक आजारांच्या संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठीही, कंडोम वापरला जातो. कंडोम हे एक रबरापासून बनलेले आवरण आहे, जे संभोगादर्म्यान पुरुष लिंगावर घातले जाते. यामुळे पुरुषाचे शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखता येतात. कंडोमच्या वापराने 87%– 98% पर्यंत गर्भावस्थेला रोखता येते. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कंडोमचा वापर सर्रास केला जातो. मात्र आपल्या सगळ्यांनाच ही उत्सुकता असते की, कंडोम नक्की कसे तयार केले जातात. तुमच्याही मनामध्ये कदाचित हा प्रश्न उद्भवला असेल, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत एक व्हिडीओ शेअर करणार आहोत, ज्यामध्ये कंडोम बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)