मिस युनिव्हर्स 2021 विजेती हरनाज कौर संधू सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर बुधवारी भारतात परतली. मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे आज संध्याकाळी मुंबईमध्ये आगमन झाले. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ समोर आला आहे. 13 डिसेंबर रोजी, इस्रायलमधील इलात येथे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्सची 70 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती, जिथे 21 वर्षीय हरनाज कौर संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली.  पंजाबच्या हरनाज संधूने सोमवारी 79 देशांतील स्पर्धकांना हरवून मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)