जगभरात मंकीपॉक्सच्या घटनांमध्ये वाढ हितांना दिसून येत आहे. नुकतेच केरळ येथे मंकीपॉक्सचा संशयास्पद रुग्ण आढळला आहे. देशात या रोगाबाबत चिंता आणि भीती असताना आता, संसर्गजन्य रोग तज्ञ आणि एचआयव्ही/एसटीडी (HIV/STD) सल्लागार डॉ ईश्वर गिलाडा यांनी या रोगावर भाष्य केले आहे. ते म्हणतात, 'मंकीपॉक्स हा इतर लैंगिक संक्रमित संसर्गाप्रमाणेच आहे. मात्र डब्ल्यूएचओ (WHO) ही बाब घोषित करत नाही. कदाचित यामुळे सध्या संसर्ग झालेल्या लोकांविरुद्ध एक भेदभाव होण्याची शक्यता आहे.'

ते पुढे म्हणतात, 'सध्या मंकीपॉक्सवर कोणताही परिपूर्ण उपचार नाही. स्मॉलपॉक्सची लस या रोगावर उपयुक्त ठरू शकते आणि मंकीपॉक्सच्या उपचारासाठी उपचारात्मक एजंट म्हणून काम करू शकते. याबाबत आपण कोणताही भेदभाव टाळून खबरदारी घेतली पाहिजे.' गिलाडा यांनी पुढे सांगितले, 'सध्या जवळजवळ 99% प्रकरणे ही पुरुषांच्या समलिंगी लैंगिक संबंधाशी निगडीत आहेत आणि जवळजवळ 80% प्रकरणे युरोप आणि नंतर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातील आहेत. मंकीपॉक्स प्रामुख्याने जवळच्या किंवा अगदी जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातून प्रसारित होतो.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)