Monkeypox च्या संशयित रूग्णांना हाताळण्यासाठी AIIMS Delhi कडून प्रोटोकॉल जारी करण्यात आला आहे. सध्या भारतामध्ये मंकीपॉक्सचा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र जगभरात वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, आरएमएल हॉस्पिटल आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलला मंकीपॉक्ससाठी नोडल हॉस्पिटल बनवले आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. जिथे रुग्णांना उपचारासोबतच निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रुग्ण कुठेही आढळल्यास त्याला या रुग्णालयांमध्ये दाखल केले जाऊ शकते. (हेही वाचा, Monkeypox: मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं, जागतिक आरोग्य संघटनेकडून नव्या नावाची घोषणा).

एम्स दिल्ली ची नियमावली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)