लवकरच मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला शनिवारी सकाळी हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावरून पहिल्या प्रवासाला रावणा होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही देशातील 19वी सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस असून, मुंबईहून चालणारी चौथी वंदे भारत ट्रेन आणि महाराष्ट्रातून चालणारी पाचवी वंदे भारत ट्रेन असेल. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनचा एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ही ट्रेन कोकणातील बोगद्यातून व नंतर निसर्गरम्य रुळांवरून धावताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना फडणवीस यांनी, ‘हा नक्कीच एक सुंदर निसर्गरम्य प्रवास असेल’, असे लिहिले आहे. (हेही वाचा: खुशखबर! लवकरच सुरु होणार मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन; पहा ट्रायल व्हिडिओ)
This will be a beautiful scenic journey for sure !#VandeBharat https://t.co/jbWLp7WXCc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)